होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : रुळामध्ये अडकून महिलेचा मृत्‍यू  

मुंबई : रुळामध्ये अडकून महिलेचा मृत्‍यू  

Published On: Dec 26 2017 8:23AM | Last Updated: Dec 26 2017 9:29AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्‍याने  मुंबई -पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस उशिराने धावत आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व्यतिरिक्त इतर प्लॅटफॉर्मवरून वाहतूक सुरू आहे. मात्र, ४ नंबर बंद असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशिर होत आहे. मात्र, लोकलमध्ये तांत्रिक बिघाड नसून, महिला रूळामध्ये आडकल्‍याची माहिती समोर आली आहे. 

रेल्‍वे स्‍थानकावरून रूळ ओलांडत असताना एक महिला रूळामध्ये अडकली. या महिलेला रुळामधून जिवंत काढण्याचे जवळपास तासभर प्रयत्न झाले. पण त्यात यश आले नाही. महिलेचा मृतदेह आता बाहेर काढण्यात आला आहे.

बदलापूरमध्येही बिघाड
दरम्यान, ६.२३ च्या बदलापूर लोकलमध्ये प्लॅटफॉर्म नंबर ४ वर बिघाड झाला आहे. लोकलमधील बिघाड दूर करण्याचे रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत.