Sun, May 26, 2019 08:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिलेची २ मुलींसह आत्महत्या

महिलेची २ मुलींसह आत्महत्या

Published On: Jan 12 2018 1:54AM | Last Updated: Jan 12 2018 1:14AM

बुकमार्क करा
मुरबाड : वार्ताहर

सासरच्या जाचाला कंटाळून मुरबाडमधील विढे या गावात महिलेने 2 लहान मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. वैशाली चौधरी (34), मुलगी आर्या (9) व जान्हवी (7) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वेढे गावातील उल्हास चौधरी यांचा 2007 साली शहापूर तालुक्यातील मळेगाव येथील वैशाली हिच्याशी विवाह झाला. त्यानंतर तिला आर्या, जान्हवी व वैष्णवी अशा 3 मुली झाल्या. परंतु सासरच्या मंडळींकडून तिचा सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. सततच्या जाचाला कंटाळून तिने 2 मुलींसह गावापासून जवळच असलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच मुरबाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे, सपोनि एस. के. खरमाटे, पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 4 तासांनंतर तिघींचे मृतदेह बाहेर काढून गुरुवारी सकाळी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी मुरबाड पोलीसांत पती उल्हास चौधरी (41), सासू वेणूबाई चौधरी (90) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.