Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेल : फुटलेल्या जलवाहिनीने घेतला महिलेचा बळी

पनवेल : फुटलेल्या जलवाहिनीने घेतला महिलेचा बळी

Published On: Jan 17 2018 2:50PM | Last Updated: Jan 17 2018 2:50PM

बुकमार्क करा
पनवेल : विक्रम बाबर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या फुटलेल्या जलवाहिनेने बुधवारी एका महिलेचा बळी घेतला आहे. रस्त्यावर पाणी साचलेल्या रस्त्यातील खंड्यांचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात पनवेलमधील वाघिवली येथील सुजाता पाटील (वय ३१) यांना जीव गमवावा लागला. ही घटना सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास चिंचपाडा तलावपाळी येथे घडली.

जीवन प्राधिकरणाच्या भोकर पाडा येथील जवाहरलाल नेहरू जलशुध्दीकरण केंद्र ते जेएनपीटी व पनवेल या दरम्यान ३० तीस वर्षापूर्वी ११५ एकशे पंधरा एमएलडी क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. पनवेल, करंजाडे, वडघर बंबईचा पाडा, उरण या ठिकाणी जलवाहिनी तोडली जात आहे. त्या ठिकाणी वारंवार मलमपट्टी केली तरी दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फोडली जात आहे. त्यापैकी करंजाडे, चिंचपाडा येथील प्रश्न अधिक जटील बनला असून या ठिकाणी सतत जलवाहनी फुटताना दिसते. या व्यतिरिक्त इतर ठिकाणची परिस्थिती फारशी वेगळी नसून दररोज लाखो लीटर पाण्याची गळती होत आहे. 

वाहिन्यांना पॅच मारण्याकरीता प्राधिकरणाकडून सातत्याने शटटाऊन घेतला जात आहे. चिंचपाडा वडघर नजीक हि जलवाहिनी मोठ्या प्रमाणात फुटली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हि जलवाहिनी फ़ुटलेलीच आहे. परंतु त्याकडे अध्याप कुणीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे चिंचपाडा तलावपाळी येथील उरण रस्ता पाण्याखाली गेला आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हरेश्वर पाटील हे पत्नी सुजाता हिच्यासोबत दुचाकीने पनवेलवरून वाघिवली या गावाकडे निघाले होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्डयांचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी रस्त्यावर घसरली. त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेल्या सुजाता या रस्त्यावर पडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर हरेश्वर पाटील हे जखमी आहेत. यांना कामोठे येथील एमजेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.