Mon, Aug 26, 2019 02:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खंडणीखोर कथित महिला पत्रकारास अटक  

खंडणीखोर कथित महिला पत्रकारास अटक  

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 12:57AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

कल्याण पूर्वेत राहणार्‍या एका कथित महिला पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्तीला अनधिकृत बांधकाम प्रकरणात एका बांधकाम व्यावसायिकाकडून लाखो रुपये रक्कम उकळल्याच्या प्रकरणात रंगेहात अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून खंडणीची रक्कम स्वीकारताना ही कारवाई केली. चारूशीला पाटील असे खंडणीखोर महिलेचे नाव असून, या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्या बांधकामाची कल्याण-डोंबिवली महापालिकेत चारुशीला हिने तक्रार केली होती. तक्रार मागे घेण्यासाठी तिने सुरेंद्र यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र काही दिवसांनी तडजोड करून 5 लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. 

यापैकी 2 लाख रुपये चारुशीला हिने आधीच उकळल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. मात्र उर्वरित रकमेचा दुसरा हप्ता घेताना ठाणे खंडणी विरोधी पथकाने रविवारी कल्याण पूर्वेतील बाजरपेठेत सापळा रचून खंडणी स्वीकारताना तिला रंगेहात अटक केली.