Sun, Mar 24, 2019 23:41
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देहव्यापार चालवणार्‍या महिलेच्या घरात सांगाडा 

देहव्यापार चालवणार्‍या महिलेच्या घरात सांगाडा 

Published On: Dec 07 2017 2:06AM | Last Updated: Dec 07 2017 1:38AM

बुकमार्क करा

मनोर :  वार्ताहर

बोईसर, दांडीपाडा येथे पालघर पोलिसांनी मंगळवारी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. मात्र, या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. काळी जादू करून ग्राहकांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार येथे सुरू होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी सरीता भारतीने आपण 12 वर्षांपूर्वी प्रियकर आशिष कमलेशच्या सहाय्याने पती सहदेव भारती याचा खून केला. त्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह शौचालयाच्या टाकीमध्ये पुरल्याची धक्कादायक माहिती सरिताने जबानीत दिली. त्यानंतर पालघर, बोइसर पोलिसांनी सरीताचा प्रियकर कमलेशला ताब्यात घेऊन घटनास्थळी पोहचून टाकी फोडून
मानवी सांगाडा बाहेर काढला. आपण (बंगाली) काळी जादू करून महिलांना देहव्यापारास प्रवृत्त करायचो तसेच ग्राहकांना जाळ्यात ओढायचो, असे सरिताने आपल्या जबानीत म्हटले.

आपण प्रियकर कमलेशला फसवून त्याच्याशी लग्न करणार होतो. आपल्याकडे ग्राहक बनून आलेल्या बंगाली व्यक्तीकडे 1 लाख रुपयांची रोकड पाहिल्यावर आपली नियत फिरली. आपण त्याचा खून करून त्याला जमिनीत पुरले व त्या जागेवर मंदिर बनवून तांत्रिक विद्येसाठी कच्चा कोंबडा खाऊन विद्या जागृत केल्याची धक्कादायक माहिती सरिताने जबानीत दिली. त्यामुळे शौचालयाच्या टाकीत व घराच्या परिसरात दोन मानवी सांगाडे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.