Wed, Apr 24, 2019 08:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उधार परत मागितल्याने महिलेवर बलात्कार

उधार परत मागितल्याने महिलेवर बलात्कार

Published On: May 03 2018 1:42AM | Last Updated: May 03 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

उधारीने दिलेल्या दोन लाख रुपयांची मागणी करणार्‍या एका 35 वर्षांच्या महिलेवर तिच्याच 28 वर्षांच्या मित्राने घरात घुसून बलात्कार केल्याची घटना जोगेश्‍वरी परिसरात घडली. पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलिसांनी बलात्कारासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुस्तकीन शफीक खान या रशीद कंपाऊंडमध्ये राहणार्‍या आरोपीस अटक केली आहे. त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

पिडीत महिला ही जोगेश्‍वरी परिसरात तिच्या पंधरा वर्षांच्या मुलासोबत राहते. हा मुलगा सध्या आठवीत शिकत असून शाळेला सुट्टी असल्याने तो त्यांच्या नातेवाईकांकडे गेला आहे. घरकाम करुन या महिलेने काही महिन्यांत दोन लाख रुपये जमा केले होते. दोन वर्षांपूर्वी तिची मुस्तफीन खानशी ओळख झाली होती. मूळचा मुंब्राचा रहिवाशी असलेला मुस्तकीन हा जूहू येथे राहत होता. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. तो नेहमीच तिच्या घरी येत होता. याच दरम्यान त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्याला पैशांची खूपच गरज असल्याने त्याला तिने साठविलेले दोन लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने तिचे पैसे परत केले नाही. नेहमी उडवाउडवीचे उत्तर देणार्‍या मुस्तकीनने उत्तर प्रदेशातील गावातून मुंबईत येताच तिचे पैसे करण्याचे आश्‍वास दिले होते. 

26 एप्रिलला तो तिच्या घरी आला होता. यावेळी त्याने तिचे पैसे देण्यास स्पष्टपणे नकार दिला. जेव्हा येतील तेव्हा पैसे देईन. पुन्हा पैशांची मागणी केल्यास तिला त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती. याच कारणावरुन त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणानंतर त्याने तिच्या घरातच तिच्यावर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी देऊन तो तेथून निघून गेला होता.

Tags : Mumbai, mumbai news, woman Rape,  incident occurred, Jogeshwari area,