Wed, Mar 27, 2019 04:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  थर्टीफस्टला  रात्रभर बेस्टच्या बस धावणार

 थर्टीफस्टला  रात्रभर बेस्टच्या बस धावणार

Published On: Dec 28 2017 2:37PM | Last Updated: Dec 28 2017 2:37PM

बुकमार्क करा
मुंबई  : प्रतिनिधी 

नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील सागर किनाऱ्यावर येणाऱ्या जनतेच्या सोईसाठी बेस्टने ३१ डिसेंबरला रात्रभर जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील अन्य ठिकाणी समुद्र चौपाटीवर रात्रीच्या वेळी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी बसमार्ग क्रमांक ७ मर्या. ,१११ ,११२ २०३, २३१, २४७  आणि २९४ वर रात्री १०.००  वाजल्यापासून एकूण २० एकमजली जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इत्यादी ठिकाणी वाहतूक अधिकारी आणि बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन बेस्टने केले आहे.