Wed, Apr 24, 2019 20:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्‍विनी बिंद्रे खूनप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

अश्‍विनी बिंद्रे खूनप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

Published On: Mar 03 2018 7:48AM | Last Updated: Mar 03 2018 7:59AMमुंबईः प्रतिनिधी 
 
अश्‍विनी बिंद्रे (मूळ आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)पोलिस दलात 2005 साली रूजू झाल्या. त्यांची सांगलीत अभय कुरूंदकर (मूळ हिंगोली, बहुतांशी वास्तव्य आजरा येथे मावशीकडे) याच्याशी ओळख झाली. पुढे दोघांत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
 
2013 साली अश्‍विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रूजू झाल्या. तिथे असतानाही उभयतांचे संबंध कायम होते.
 
अश्‍विनी व अभय कुरूंदकर हे दोघेही त्यापूर्वीच विवाहित होते व दोघांनाही मुले होती. याचदरम्यान कुरूंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिंद्रे यांच्यासोबत लग्‍न करण्याचे वचन दिले होते. त्यानुसार अश्‍विनी यांनी अभय कुरूंदकरकडे लग्‍नाचा तगादा लावला. मात्र, कुरूंदकरला अश्‍विनी यांच्याशी लग्‍न करायचेच नव्हते.
 
लग्‍न करण्यावरून कुरूंदकर आणि अश्‍विनी बिंद्रे यांच्यात रोजच भांडणे होती.
 
2015 साली अश्‍विनी यांची बदली कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र, त्या हजर झाल्या नाहीत.
 
दोघांचीही बदली नवी मुंबई आणि ठाण्यात झाल्यानंतरही उभयतांचा संपर्क कायम होताच. याशिवाय अश्‍विनी बिंद्रे सतत लग्‍नाचा तगादा लावत राहिल्या. अश्‍विनी बिंद्रे यांंची ही कटकट संपवावी म्हणून त्यांची हत्या करण्याचा डाव कुरूंदकरने रचला असावा.
 
15 एप्रिल 2016 पासून अश्‍विनी कळंबोलीतून बेपत्ता.
 
24 डिसेंबर 2017 ला अभय कुरूंदकर आणि राजू पाटीलला अटक
 
अश्‍विनी बेपत्ता झाल्यानंतर अभय कुरूंदकर यांनी भाईंदरमधील घराचा रंग बदलला. त्यातून पोलिसांचा संशय बळावला आणि तो त्यांनी कोर्टासमोर व्यक्‍त केला. तपास गुन्हे शाखेकडे.
 फेबु्रवारी 2018 मध्ये कुरूंदकरचा चालक कुंदन भंडारीला अटक.
 
भंडारीच्या चौकशीतून महेश फळणीकरचे नावे पुढे आले. त्याला 27 फेबु्रवारीला कात्रजमधून अटक.
 
भंडारी, फळणीकरची पोलिस कोठडीत दोन दिवस एकत्र चौकशी केली.

28 फेबु्रवारीला फळणीकरने अश्‍विनी बिंद्रे यांची कुरूंदकरने हत्या केल्याचे व त्यांच्या शरीराचे तुकडे केल्याची माहिती दिली.
 
1 मार्च रोजी झालेल्या चौकशीत अश्‍विनी बिंद्रेंच्या मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकल्याची माहिती फळणीकरने दिली.
 
2 मार्चला पोलिस पथक तपासासाठी वसई खाडी आणि भाईंदर येथील कुरूंदकरच्या घरी.
 

संबंधित बातम्याः

मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी नौदलाची मदत

अश्‍विनी बिद्रेंच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फेकले खाडीत