Wed, Jul 08, 2020 19:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ५ वर्षांत मंत्र्यांची संपत्ती ८० टक्के वाढली

५ वर्षांत मंत्र्यांची संपत्ती ८० टक्के वाढली

Last Updated: Oct 17 2019 1:39AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

भाजप युती सरकारमधील अनेक विद्यमान मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. या मंत्र्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रातून आपली संपत्ती जाहीर केली आहे. 2014 च्या तुलनेत या मंत्र्यांच्या संपत्ती 142 कोटी कोटींनी वाढ झाली आहे. प्रजा फाऊंडेशनने प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही माहिती जाहीर केली आहे. 

गेल्या पाच वर्षांत या मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये सुमारे 80 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2014 मध्ये या मंत्र्यांची संपत्ती 179 कोटी 80 लाख एवढी होती. त्यामध्ये वाढ होऊन ही संपत्ती आता 322 कोटी 50 लाखांवर गेली आहे. ही संपत्ती भ्रष्टाचार किंवा गैरकारभारातून वाढली असे म्हणने नसून ती कायदेशीर मार्गानेही वाढू शकते. पाच वर्षात  मालमत्तेच्या किंमत वाढल्यामुळेही ती वाढू  शकते, असे प्रजा फाउंडेशनने स्पष्ट केले आहे. 

परतूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपत्तीत सर्वाधिक 27 कोटी 10 लाखांची वाढ झाली आहे. तर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची संपत्ती 21 कोटी 70 लाखांनी वाढली आहे. 2014 मध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे 13 कोटी 40 लाख रुपयांची संपत्ती होती. ती आता 35 कोटी 40 लाख एवढी झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे.  2014 3 कोटी 2 लाख एवढी संपत्ती पाटील यांच्याकडे होती. ती आता 29 कोटी 3 लाख एवढी झाली आहे. सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, अशोक उईके, राम शिंदे, संजय कुटे,  जयकुमार रावल आदी मंत्र्यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. 

शिवसेनेचे मंत्रीही संपत्तीत मागे नाहीत. रोजगार हमी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची 2014 साली असलेली संपत्ती 57 कोटींवर गेली आहे. तर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची संपत्ती 7 कोटी कोटींवरून 11 कोटीवर गेली आहे.

मंत्री 2014 ची संपत्ती 2019 ची संपत्ती एकूण वाढ 
बबनराव लोणीकर 2 कोटी 30 लाख     29 कोटी 40 लाख     27 कोटी 10 लाख
पंकजा मुंडे 13 कोटी 70 लाख 35 कोटी 40 लाख 21 कोटी 70 लाख
सुभाष देशमुख 31 कोटी 90 लाख 48 कोटी 50 लाख 16 कोटी 60 लाख
जयदत्त क्षीरसागर 44 कोटी 70 लाख 57 कोटी 70 लाख 13 कोटी