Wed, Jan 22, 2020 22:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिटलरशाहीविरोधात लढा सुरूच राहील : मनसे

हिटलरशाहीविरोधात लढा सुरूच राहील : मनसे

Published On: Aug 19 2019 10:26AM | Last Updated: Aug 19 2019 10:28AM

मनसे नेते संदीप देशपांडेमुंबई : पुढारी ऑनलाईन

कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केवळ दबाबतंत्र निर्माण करण्यासाठी राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. मात्र, आमचा या हिटलरशाहीविरोधात लढा सुरूच राहील, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावली असून त्यांची २२ ऑगस्ट रोजी चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, सरकारचे हे दबावतंत्र आहे. गेल्या पाच- सहा वर्षात भाजपच्या एकाही दिग्गज नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. अशा कारवाईला आम्ही घाबरणार नाही.

दरम्यान, या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेश जोशी यांनाही ईडीकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. 

कोहिनूर मिल क्रमांक ३ खरेदीत राज ठाकरे यांच्या भूमिकेची यावेळी चौकशी केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. आगामी  विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरे मतदारांवर प्रभाव पाडू शकतील अशी शक्यता वाटल्याने त्यांना अडकवण्याचा खटाटोप चालल्याचा आरोपही मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. हे सरकार सुडाचे राजकारण करत आहे, असे ते म्हणाले.