Wed, May 22, 2019 22:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिपाशा, करिश्मा यांच्याकडून मतदान जनजागृती

बिपाशा, करिश्मा यांच्याकडून मतदान जनजागृती

Published On: Jan 25 2018 1:25PM | Last Updated: Jan 25 2018 1:25PMठाणे: दिलीप शिंदे

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज ठाण्यात नवमतदार जनजागृतीसाठी आणि मतदानाचे महत्व सांगण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू आणि करिश्मा कपूर ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये  आल्या होत्या. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन या दोन्ही अभिनेत्री आणि कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल , पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी केले.  

सैन्यातील २१८६ मतदारांनी नोंदणी केली तर ३३५ तृतीय पंथीयांची यावेळी नोंद करण्यात आली. यावेळी जिल्‍हाधिकार्‍यांकडून शपथ देण्यात आली.