Mon, May 27, 2019 00:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी ‘विराट‘; सोशल मीडियावर पोस्टरचा धुमाकुळ 

...जेव्हा विराट ग्रामपंचायतीच्या प्रचारात उतरतो!

Published On: May 27 2018 11:56AM | Last Updated: May 27 2018 11:41AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

निवडणूक मग ती लोकसभेची असो वा ग्रामपंचायतीची नेत्यांचा कल फक्त गर्दी जमवण्याकडे असतो. गर्दी जमवण्यासाठी अनेक सेलिब्रीटीजना बोलावणे धाडले जाते. सेलिब्रीटीजही आपलाच नेता योग्य आहे त्याला मत द्या असे ठासून सांगत असतात. पण, राज्यातल्या एका गावात उमेदवाराच्या प्रचारासाठी चक्क भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली उपस्थित राहीला. विराटच्या या अनोख्या प्रचाराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पुण्यातील शिरूर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत विराट कोहलीही दिसला. या निवडणुकीतील रामलिंग ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाचे उमेदवार विठ्ठल गणपत घावटे यांच्या प्रचारार्थ विराट शिरूरच्या रस्त्यावर उतरला होता. खरी गोष्ट अशी आहे की, लोकांना सांगण्यात आले की विराट कोहली येतोय पण प्रत्यक्षात त्याचा डुप्लिकेट प्रचारासाठी आला होता. 

विराट गावात येणार म्हणून जोरदार तयारी करण्यात आली होती. रामलिंग पॅनलचे चिन्हही ‘बॅट’असल्याने विराटच्या डुप्लिकेटने बॅट हातात घेत विठ्ठल गणपत घावटे यांना मते द्या असे अवाहनही त्याने केले. 

विराटच्या स्वागतासाठी गावात पोस्टरबाजी करण्यात आली. पोस्टरवर खऱ्या विराटचा फोटो लावण्यात आल्याने सर्वांनाच त्याला पाहण्याची उत्सुकता होती. पण, डुप्लिकेट विराट आल्याने चाहत्यांनी निराश न होता त्याच्यासोबत फोटो काढले. या प्रचाराच्या पोस्टरचे फोटो ट्विटरवरही शेअर करण्यात आले आहेत.