Sat, Jul 20, 2019 23:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या 'सुप्रिया'चा बेवफा बॉयफ्रेंड कोण?

मुंबईच्या 'सुप्रिया'चा बेवफा बॉयफ्रेंड कोण?

Published On: Feb 21 2018 1:35PM | Last Updated: Feb 21 2018 3:39PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

सोशल मीडियवार कधी काय व्हायरल होईल आणि ट्रेन्डमध्ये येईल याचा काही नेम नाही. सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. आता फेसबुकवर मुंबईतील सुप्रिया नावाच्या एका मुलीचा शोध घेतला जात आहे.

ऐश्वर्या नावाच्या एका तरुणीने फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एका बेवफा बॉयफ्रेंडची पोलखोल करण्याचे आवाहन नेटकऱ्यांना केले आहे. तिने पोस्टमध्ये लिहलंय की, ‘दोन मुले माझ्या मागे बसली होती. त्यांच्यात प्रेयसीची दिशाभूल केल्याची चर्चा रंगली होती. ‘मी सुप्रियाला धोका दिला आहे, काल मी सुप्रियासोबत नाही तर निधीसोबत फिरायला गेलो होतो. यावर त्याचा दुसरा मित्र म्हणतो, भावा तू तर अजबच आहेस, सुप्रियाला तर हे कधीच कळणार नाही’ 

ऐश्वर्याने सुप्रियाला उद्देशून पुढे लिहलंय की, सुप्रियाला नक्कीच कळेल, जर तुझ्या बॉयफ्रेंडचे नाव अमन आहे आणि त्याने तुला भेटण्याचे वचन दिले होते. पण अचानकपणे काहीतरी कारण सांगून तो तुला भेटला नाही. याचा अर्थ असा आहे की, तो तुला फसवतोय. अज्ञात सुप्रियाला सावध करण्यासाठी  ऐश्वर्याने मुलाचे वर्णनही केले आहे. मुलगा दिसायला एकदम सडपातळ आहे व काळा चश्मा घालतो. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक सुप्रियापर्यंत ही पोस्ट पोहोचवा असेही तिने म्हटले आहे.

 

ऐश्वर्याने तिची ही पोस्ट लोकांनी शेअर करावी, असे अवाहनही केले आहे. तसेच सुप्रियाला शोधण्यात मदत करावी, अला उल्लेख  यात करण्यात आला आहे. #SaveSupriya #SupriyaKaBFBewafaHai हे हॅशटॅग वापरून ही पोस्ट शेअर करावी असेही ऐश्वर्या म्हणाली. 

या पोस्टनंतर अनेकांनी ऐश्वर्याला पाठिंबा देत तीचे कौतुक केले आहे. तर तीची ही पोस्ट व्हायरलही केली आहे. ही पोस्ट जेव्हा खऱ्या सुप्रिया पर्यंत पोहोचेल तेव्हा तीचा आणि त्या चश्मेवाल्या मुलाचा ब्रेकअप होईल हे निश्चित. 

No automatic alt text available.