Sat, Jul 20, 2019 10:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपच्या ट्विटरवर काँग्रेस नेते ‘टॅग’

भाजपच्या ट्विटरवर ‘फडणवीस सरकारच’ टार्गेट 

Published On: Dec 03 2017 2:31PM | Last Updated: Dec 03 2017 3:06PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

तुम्ही वापरत असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सावधपणे हाताळावे लागतात. त्यातून कधी काय पोस्ट होईल आणि आक्षेपार्ह मजकूर जाईल काही सांगता येत नाही. ‘महाराष्ट्र भाजपा’ या ट्विटरवरून आज सकाळी एक ट्विट करण्यात आले. या ट्विटमधून देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाना साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे ट्विट काँग्रेस नेत्यांना टॅगही करण्यात आले आहे. 

‘महाराष्ट्र भाजपा’च्या ट्विटरवरून आज सकाळी १०.३० च्या सुमारास एक ट्विट करण्यात आले होते. यामध्ये ‘ राज्यात एकीकडे २ लाख कर्मचाऱ्यांची गरज असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सरकार ३० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. हे ‘मेक इन महाराष्ट्र नाही तर फूल इन महाराष्ट्र आहे’ असे ट्विट करण्यात आले आहे. 

आश्चर्याची गोष्ट अशी की या ट्विटमध्ये काँग्रेस नेत्यांना टॅग करण्यात आले आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या घटनेवर कोणीही स्पष्टीकरण दिलेले नाही.