Sat, Feb 23, 2019 18:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोल्हापूरच्या विद्यार्थींनीची विनोद तावडे यांनी घेतली भेट

कोल्हापूरच्या विद्यार्थींनीची विनोद तावडे यांनी घेतली भेट

Published On: Dec 16 2017 3:23PM | Last Updated: Dec 16 2017 3:23PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

गृहपाठ केला नाही म्हणून ५०० उठाबशा काढणारी विद्यार्थी विजया निवृत्ती चौगुले हिची आज केईएम रुग्णालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भेट घेतली. तिच्या तब्बेतीची विचारपूस केली आणि तिला हिम्मत दिली. तिच्यावर उपचार करणारे न्यूरॉलॉजिस्ट डॉ.रावत आणि डॉ.प्रविण बांगर यांच्याकडून तिच्या उपचाराची माहिती घेतली. 

‘विजयावरील उपचारावर तिचे कुटुंबिय समाधानी आहे. विजया लवकरच पूर्णपणे बरी होऊन पुन्हा कोल्हापूरच्या शाळेत जाऊ शकेल. पण विजयाची पुन्हा त्याच शाळेत जाण्याची मानिसकता नसेल तर तिला तेथून जवळच्या दुसऱ्या शाळेत प्रवेश देण्यात येईल’ असे तावडे यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण  

कोल्हापुरातील कानूर बुद्रूकमधील भावेश्‍वरी संदेश विद्यालयातील मुख्याध्यापिकाने शाळेत वही आणायला विसरल्याच्या क्षुल्लक कारणावरून या मुलीला चक्क 500 ऊठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. शिक्षिकेच्या आदेशानुसार तिने 300 ऊठाबशा काढल्या आणि ती जमिनीवर कोसळली. मुलीची प्रकृती पाहता तिला तातडीने कोल्हापूरमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी सीटीस्कॅन, एमआरआय व अन्य शारीरिक चाचण्या केल्या. मात्र काहीच निदान झाले नाही. मुलीची प्रकृती पाहता रुग्णालयातील डॉक्टरांनी कुटुंबीयांना तिला मुंबईत हलवण्याचा सल्ला दिला.