Thu, Apr 18, 2019 16:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मीडियामुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणरेडी, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा नवा जावई शोध

मीडियामुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणरेडी, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा नवा जावई शोध

Published On: Sep 07 2018 5:37PM | Last Updated: Sep 07 2018 5:39PMमुंबई : प्रतिनिधी

भाजपचे आमदार राम कदम यांचा वाचाळगिरीचा प्रताप ताजा असतानाच आता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्‍यात नव्याने भर घातली आहे. माध्यमांमुळे समाजात राजकारण्यांची घाणेरडी प्रतिमा तयार झाली आहे असं वादग्रस्त वक्‍तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. एवढंच नाहीतर माध्यमे दाखवतात त्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात असा जावाईशोधही तावडे यांनी लावलाय.

मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी विनोद तावडे आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांपैकी कुणाला राजकारणात यायचंय असा प्रश्न तावडेंनी उपस्थित केला. त्यावर विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद आल्याने राजकारणाला बदनाम करण्यासाठी माध्यमे जबाबदार आहेत, असे मत तावडे यांनी व्यक्त केले.

विनोद तावडे यांनी असं वक्तव्य करणे हे धक्कादायक आणि संतापजनक आहे. त्यांनी सर्व माध्यमांची जाहीर माफी मागावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार एसएम देशमुख यांनी केली.
विनोद तावडे यांनी याआधीही वादग्रस्त निर्णय घेतल्यामुळे टीकेचे धनी झाले होते 'आम्हा राजकीय नेत्यांना सगळंच फुकट द्यायची सवय असते. नागरिकसुद्धा जेवढे जेवढे फुकट मिळेल तेवढे बरं याच मूडमध्ये असतात,' असं वक्तव्यही विनोद तावडे यांनी मागील वर्षी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात केलं होतं. तसेच 2017 मध्ये पुण्यात भारती विद्यापीठ पदवी प्रदान कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी विनोद तावडे यांनी पीएचडीतील गैरकारभाराचा खुलासाच केला. खरंखोटं काय आहे माहित नाही. पीएचडी ही कॉपीपेस्ट तरी आहे. संशोधन हे नावाला आणि कॉपी पेस्ट जादा अशी स्थिती आहे. असा धक्कादायक खुलासा विनोद तावडे यांनी केला होता.