Fri, Apr 26, 2019 04:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक; मुंबईत गटारीत ठेवली जाते भाजी (Video)

धक्कादायक; गटारीत ठेवली जाते भाजी (Video)

Published On: Feb 09 2018 6:20PM | Last Updated: Feb 10 2018 12:02PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईत गेल्‍या काही दिवसांपासून फेरीवाले आणि राजकीय पक्ष यांच्यातला संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेकडून फेरीवाल्‍यांना हटवण्यात येत नसल्‍याने काही पक्षांनी स्‍वत:च पुढकार घेत रस्‍त्‍यावरील फेरीवाल्‍यांना हटवण्याची माहिम सुरू केली होती. यात फेरीवाल्‍यांच्या साहित्‍याची मोडतोड आणि मारहाणीच्या घटनाही घडल्‍या होत्‍या. याचा फेरीवाल्‍यांनीही धसका घेतला होता. यानंतर फेरीवाले रस्‍त्‍यांवर दिसत नव्हते. मात्र आता, मनपाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी फेरिवाल्‍यांनी विक्रीच्या भाज्‍या चक्‍क आता गटारात लपवायला सुरूवात केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. विक्रेत्‍यांच्या अशा प्रकाराचा परिणाम ग्राहकांच्या जीवावर बेतणार आहे.

फेरीवाल्‍यांनी मुंबई महापालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आणि पुन्हा त्याच जागी धंदा करण्यासाठी आता नामी शक्‍कल लढवल्‍याचे समोर आले आहे. फेरीवाल्‍यांनी विक्रीचा भाजीपाला व इतर साहित्‍य लपवून ठेवण्यासाठी आता चक्‍क पाणी वाहून नेण्यासाठी बनवण्यात आलेल्या गटारांचा वापर करायला सुरूवात केली आहे. हा प्रकार मुबईतील वाकोला, सांताक्रुझ या ठिकाणी समोर आला आहे. फेरीवाल्‍यांकडून अशा प्रकारे गटारीत भाजीपाला ठेवल्‍याने हीच भाजी ग्राहक विकत घेणार असल्‍याने  हा भाजीपाला ग्राहकांच्या आरोग्‍याच्या दृष्‍टीने घातक ठरणार आहे.