Sun, Nov 18, 2018 07:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांकडून डावखरे यांचे अंत्यदर्शन (व्‍हिडिओ)

राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांकडून डावखरे यांचे अंत्यदर्शन (व्‍हिडिओ)

Published On: Jan 05 2018 3:31PM | Last Updated: Jan 05 2018 3:31PM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे राजशिष्टाचार विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास कळविले असून जवाहरबाग स्मशानभूमी याठिकाणी दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत. 

दरम्यान आज सकाळी वसंतराव डावखरे यांचे पार्थिव ठाणे पूर्व हरिनिवास परिसरातील गिरिराज हाईट्स येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री विनोद तावडे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी  त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. 

यावेळी अनेक राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, ठाण्यातील व मुंबईतील त्यांचे अनेक हितचिंतक, मित्र यांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. प्रामुख्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाण्यातील सर्व पक्षाचे आमदार, कार्यकर्ते यांचा समावेश होता.

यावेळी सभापती रामराजे निबालकर, माणिकराव ठाकरे, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे-पाटील, राणा पडमसिह पाटील, दीपक साळुंखे, किरण पावसकर, हेमंत टाकले आदी उपस्‍थित होते.