Wed, Jul 17, 2019 18:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वळवी प्रकरणात हायकोर्टाचा खा. राणे यांना तूर्त दिलासा 

वळवी प्रकरणात हायकोर्टाचा खा. राणे यांना तूर्त दिलासा 

Published On: Aug 15 2018 1:58AM | Last Updated: Aug 15 2018 1:58AMमुंबई :

तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार पद्माकर वळवी यांना 17 वर्षांपूर्वी डांबून ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी खासदार नारायण राणे यांना उच्च न्यायालयाने तूर्त दिलासा दिला. उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत राणे यांच्याविरोधातील खटल्याला न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आण न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी 2002 साली मुंबईत आले होते. त्यावेळी राणे यांनी मातोश्री स्पोर्टस् क्लब येथे वळवी यांना बोलावले व काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. वळवी यांनी त्याला विरोध करत तेथून निसटायचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या बॉडीगार्डने वळवी यांना अडविले व डांबून ठेवले. दुसर्‍या दिवशी वळवी तेथून रिक्षाने निसटले. परंतु, राणेंच्या माणसांनी त्यांना हिरानंदानी गार्डनजवळ गाठले व त्यांना पुन्हा त्या ठिकाणी घेऊन आले. वळवी यांनी कशीबशी आपली सुटका करून घेत याप्रकरणी 27 जुलै 2002 रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.