Sun, Apr 21, 2019 03:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : संगणक बंद, लोकलची तिकीटेच मिळेनात (video)

मुंबई : संगणक बंद,लोकलची तिकीटे मिळेनात(video)

Published On: Jan 24 2018 4:39PM | Last Updated: Jan 24 2018 4:52PMनवी मुंबई:प्रतिनिधी 

सानपाडा रेल्वे स्थानकातील संगणक बंद पडल्याने प्रवाशांना तिकिट मिळत नाही. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी तिकिट खिडकीवर गोंधळ घालून याबाबत जाब विचारला. मात्र युपीएस यंत्रणेत बिघाड झाल्याने तिकिट देऊ शकत नसल्याचे सानपाडा रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

दुपारी 3 वाजून 59 मिनिटाला तिकिटाचा गोंधळ सुरू झाला. प्रवाशांची लांब रांग पाहून तिकिटमास्तरांची भांबेरी उडाली. एखादे तिकिट कोरे छापून दिल्यास 2400 रूपये दंड रेल्वे आमच्या कडून वसूल करते. यात आमचा दोष नसल्याचे सांगत अर्धवट छापून आलेल्या तिकिटावर पेनाने लिहून शिक्का मारत प्रवाशांच्या हातात सोपविण्यात आले. पनवेलवरून संगणक यंत्रणा दुरूस्त करण्यासाठी अभियंता येणार असल्याचे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना सांगण्यात आले. विशेष म्हणजे स्थानकातील चार ईव्हीएम मशीन देखील बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले.