Sat, Nov 17, 2018 10:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'दलित' शब्दासाठी आरपीआय सर्वोच्च न्यायालयात जाणार

'दलित' शब्दासाठी आरपीआय सर्वोच्च न्यायालयात जाणार

Published On: Sep 11 2018 11:44AM | Last Updated: Sep 11 2018 11:43AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

शासन व प्रसार माध्यमांमधून दलित शब्दाचा उपयोग करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पंकज मेश्राम यांनी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने दलित शब्द वापरण्यास मनाई केली. या आदेशाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे. आरपीआय याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सरकारी कामकाजाजत आधीपासून अनुसूचित जाती आणि जमाती असे शब्द वापरले जात आहेत. त्यामुळे या शब्दाचा वापर सुरू ठेवावा अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्‍यक्‍त केली. पंकज मेश्राम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना दलित शब्द वापरण्यास मनाई करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हा शब्द वापरण्यास विरोध केला होता असं याचिकेत नमूद करण्यात आले होते म्‍हणून न्यायालयाने दलित शब्द वापरू नये अशा सूचना दिल्या होत्या.