Tue, Feb 19, 2019 10:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्थसंकल्पाविषयी विचारा अभय टिळक यांना प्रश्न

अर्थसंकल्पाविषयी विचारा अभय टिळक यांना प्रश्न

Published On: Feb 01 2018 1:35AM | Last Updated: Feb 01 2018 1:35AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली गुरूवारी अर्थसंकल्‍प सादर करीत आहेत. या अर्थसंकल्‍पाकडे सार्‍या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पण, अर्थसंकल्पाचा अर्थ सगळ्यांनाच कळतो असे नाही. सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. त्या शंकांचे निरसन करण्यासाठी यावेळी पुढारी ऑनलाईनने एक व्‍यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 

देशाचा अर्थसंकल्‍प गुरूवारी सादर होत असताना अनेक तज्ज्ञांकडून या अर्थसंकल्‍पाविषयी विविध शक्‍यता वर्तविण्यात येत आहेत. मोबाईल, लॅपटॉप, इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू, कस्‍टम ड्यूटी महागण्याची चिन्‍हे व्‍यक्‍त करण्यात येत आहेत. या सगळ्यात सामान्यांच्या मनात शंका निर्माण होतातच. पुढारी ऑनलाईनच्या वाचकांच्या शकांचे निरसन करण्यासाठी दुपारी तीन वाजल्यानंतर ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अभय टिळक उपलब्ध असणार  आहेत. आपले प्रश्न उपस्थित करण्यासाठी वाचकांनी केवळ या बातमीच्या कमेंट सेक्‍शनमध्ये प्रश्न विचारायचे आहे. त्या प्रश्नांची उत्तरे अभय टिळक देणार आहेत. या उत्तरांची एक स्वतंत्र बातमी पुढारीच्या याच वेबसाईटवर तुम्हाला वाचायला मिळेल.