Wed, Feb 20, 2019 11:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'पवार साहेबांच्या गुप्‍त भेटीवेळी २००० साल का आठवलं नाही'

'पवार साहेबांच्या गुप्‍त भेटीवेळी २००० साल का आठवलं नाही'

Published On: Feb 23 2018 12:15PM | Last Updated: Feb 23 2018 12:37PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

पुण्यात जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप आयोजित शोध मराठी मनाचा या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दीर्घ मुलाखत घेतली. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक गोष्टीवर भाष्य करीत त्यांनी देशातील राजकारणाबरोबरच राज्यातील राजकारणावरही प्रतिक्रीया व्‍यक्‍त केली. यावेळी त्‍यांनी बाळासाहेबांविषयीही मत व्‍यक्‍त केले. यावर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले होते. बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा शिवसेना प्रमुखांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना केला होता. 

यानंतर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना टविट्‌रव्‍दारे लक्ष्य केले आहे. यामध्ये त्यांनी पवार साहेबांची गुप्त भेट घेताना २००० साल का आठवलं नाही?, असा सवाल उपस्‍थित केला आहे.