Wed, Aug 21, 2019 15:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विमानतळ परिसरात रायगडाची प्रतिकृती उभारणार : उद्धव ठाकरे

विमानतळ परिसरात रायगडाची प्रतिकृती उभारणार : उद्धव ठाकरे

Published On: Mar 04 2018 3:24PM | Last Updated: Mar 04 2018 3:24PMमुंबई : प्रतिनिधी

विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कित्येक वर्षे झाली उन्हापावसात उभा आहे. हे आम्ही सहन करणार नाही. जर एअरपोर्ट ऑथोरिटीला पुतळ्यावर छत्र उभारता येत नसेल तर शिवसेना स्वत:च्या हिमतीवर ते उभारेल, शिवरायांच्या पुतळ्याभोवती रायगडाची प्रतिकृती उभारेल, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवजयंती निमित्त उद्धव ठाकरे यांनी विमानतळ परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करून मानवंदना दिली. भारतीय कामगार सेनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव यांनी शिवरायांच्या पुतळ्याकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधत महाराजांच्या पुतळ्यावर छत्र सावली उभारण्यात यावी अशी सूचना केली. ज्यांच्याकडे विमानतळ परिसराची जबाबदारी आहे, त्यांनी हे काम केले नाही तर शिवसेना यासाठी पुढाकार घेईल असे सांगितले.

शिवजयंती हा उत्सव केवळ  महाराजांच्या जन्मापुरताच मर्यादित नाही. तर हा दिवस म्हणजे ३०० ते ४०० वर्षांपूर्वी हा महाराष्ट्र हिरव्या अंधाराने व्यापला होता. त्यातून बाहेर काढून शिवरायांनी हिंदूंचा पुर्नजन्म घडवला आहे. तो हा पुर्नजन्माचा दिवस आहे. हा केवळ एक दिवस नव्हे तर हा एक सण आहे. तो सण अभिमानाने साजरा करा,असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.