Mon, Jun 17, 2019 15:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संभाजी भिडे आजच्या काळाचे ‘बाजीप्रभू’ : शिवसेना 

संभाजी भिडे आजच्या काळाचे ‘बाजीप्रभू’ : शिवसेना 

Published On: Jun 12 2018 1:44PM | Last Updated: Jun 12 2018 1:11PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

‘‘भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. त्‍यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. संभाजी भिडे गुरुजी म्हणजे आजच्या काळातील बाजीप्रभू देशपांडे आहेत. अशा शब्‍दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्‍या सामनातून संभाजी भिडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.  

हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत'' असे सामनातून म्‍हटले आहे. कसाब आणि त्याची पाकिस्तानी टोळी मुंबईवर चाल करून आली ती हातात तलवार घेऊन नाही. एके–४७ आणि बॉम्बचा मारा करीत हे नराधम मुंबईत घुसले होते. या सगळ्यांचा विचार करूनच भिडे गुरुजींना त्यांची तलवारबंद फौज उभी करावी लागेल. असे म्हणत आम्‍ही भिडे गुरुजींसोबत असल्‍याचे शिनसेनेने म्‍हटले आहे. 

भिडे गुरूजींवर कोरेगाव-भीमा प्रकरणात लावण्यात आलेल्या आरोपसंदर्भात देखील शिवसेनेने संपादकीमध्ये भाष्‍य केले आहे. ‘‘भीमा-कोरेगाव दंगलीशी संबंध असलेले माओवादी पुणे पोलिसांनी पकडले आहेत. त्यांची मजल तर फारच पुढे गेली आहे. लाखभर राऊंड फायर होतील अशी शस्त्र मिळविण्याच्या तयारीत ते आहेत. त्‍यांनी त्यासाठी सात-आठ कोटी रुपये जमा केल्‍याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. अशा लोकांपुढे आपल्या तलवारी कशा टिकणार? असा सवाल उभा करत संपादकीयमधून चिंता व्यक्त करत, धर्मांध दहशतवाद्यांविरुद्ध लढायचे असले तरीही तलवारीचा उपाय चालणार नसल्‍याची म्‍हटले आहे. 

‘‘स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लेखकांना  लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या’’ असे आवाहन ७५ वर्षांपूर्वी केले होते. त्यांच्याही डोळय़ांसमोर तलवारी नव्हत्या. काश्मीरमधील अतिरेक्यांशी लढण्यासाठी हिंदू तरुणांना हाती ‘एके-४७’ घ्याव्या लागतील. असा इशारा सामनामून देण्यात आला आहे.