Thu, Jul 18, 2019 17:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › न्यायव्यवस्थेला मुकी, बहिरी केली जातेय का? : उद्धव ठाकरे

न्यायव्यवस्थेला मुकी, बहिरी केली जातेय का? : उद्धव ठाकरे

Published On: Jan 13 2018 2:02PM | Last Updated: Jan 13 2018 2:03PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

न्यायव्यवस्था ही आंधळी असल्याचं म्हटलं जातं. ती निःपक्षपातीपणाने निर्णय देते म्हणून, तिला आंधळी म्हटले जाते. पण, याच न्याय व्यवस्थेला आंधळी आणि बहिरी करण्याचे काम कोणी करत आहे का?, याचा शोध घेतला पाहिजे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. या देशात रहायचे असल्यास कोण्या एकाचा गुलाम बनून राहिले पाहिजे, असे वातावरण कोण तयार करत आहे का?, याचाही तपास केला पाहिजे, असेही मत ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. मुळात त्यांच्या तक्रारींकडे गाभीर्याने लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या तक्रारींच्या खोलात जायला हवे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप न करता तसेच या विषयाचे राजकरण न करता. या तक्रारींचा निवाडा व्हायला हवा.'

एका मोठ्या विषयाला वाचा फोडणाऱ्या या चारही न्यायमूर्तींचे कौतुक करायला हवे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, 'इतके मोठे पाऊल उचलणाऱ्या चार न्यायमूर्तींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पण, ही कारवाईही एकतर्फी असता काम नये. त्यांना हे पाऊल उचलायला लागण्या मागची कारणेही जाणून घेतली पाहिजेत.'