Mon, Sep 24, 2018 09:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विश्वविजेत्या भारतीय युवा संघाचे जल्लोषात स्वागत

विश्वविजेत्या भारतीय युवा संघाचे जल्लोषात स्वागत

Published On: Feb 05 2018 4:55PM | Last Updated: Feb 05 2018 4:55PMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी

१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवत चमक दाखवणाऱ्या भारतीय युवा ब्रिगेडचे जल्लोषात छत्रपती शिवाजी मुंबई विमानतळावर स्वागत झाले.

भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय संघाचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) पदाधिकारी स्वागताला उपस्थित होते. एमसीएचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे व सह सचिव डॉ. पी.व्ही. शेट्टी हे विमानतळावर संघाच्या स्वागतासाठी आले होते. याबरोबरच चाहत्यांनी देखील विमानतळावर विश्वचषक विजेत्या युवा ब्रिगेडची झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. जवळपास दुपारी ३.३० च्या दरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविड सोबत बाहेर आला तेव्हा वातावरण जल्लोषमय झाले होते. विमानतळावर ‘इंडिया! .. इंडिया!’ चा नारा ऐकायला मिळत होता.