Sun, Apr 21, 2019 04:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : कॅफेची तोडफोड; 'स्‍वाभिमानी' कार्यकर्त्यांना अटक

कॅफेची तोडफोड; 'स्‍वाभिमानी' कार्यकर्त्यांना अटक

Published On: Jan 11 2018 2:45PM | Last Updated: Jan 11 2018 2:45PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील एका कॅफेची तोडफोड करून मालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्‍वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत. तर मेहताब शेख (वय ४१), मनोज ठाकूर (वय ३३) या दोघांना अटक करण्यात आले आहे. 

काल, बुधवारी अंधेरी पश्चिम येथील पंच मार्गावर असणार्‍या कौशल रश्‍मीकांत शहा (वय ३१) यांच्या सिरोको कॅफेमध्ये १० ते १५ जण जबरदस्‍तीने घुसले. त्यांनी आरडाओरड करत कॅफेची तोडफोड केली. यावेळी त्यांच्या हातात स्‍वाभिमानी संघटनेचे लाल झेंडे होते. तसेच कॅफेत असणार्‍या कामगारांना शिवीगाळ करून शहा यांना जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद शहा यांनी दिली होती. 

त्यानुसार पोलिसांनी स्‍वाभिमानी कार्यकर्त्यांवर गुन्‍हे दाखल केले असून दोघांना अटकही करण्यात आले आहे. याप्रकरणी इतरांचा शोध सुरू आहे. कौशल शहा हे हॉटेलमध्‍ये असताना स्वाभिमानी संघटनेच्या दहा ते बारा अनोळखी कार्यकर्त्यांनी स्वाभिमान संघटनेचे लाल रंगाचे झेंडे हातात घेऊन जोरजोरात घोषणा दिल्‍या. तसेच कॅफेमधील साहित्‍याची तोडफोड करुन कॅफेमधील कामगारांना शिवीगाळ केली. तसेच शहा यांना जीवे मारण्याची धमकी दिली.