Wed, Sep 19, 2018 08:39



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बंद फाटकातून दुचाकी रेटणारे दोघे एक्स्प्रेसच्या धडकेत ठार

बंद फाटकातून दुचाकी रेटणारे दोघे एक्स्प्रेसच्या धडकेत ठार

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 19 2018 12:57AM



ठाणे : प्रतिनिधी

दिवा रेल्वे स्थानकाजवळ बंद फाटक ओलांडून जात असलेल्या दुचाकीला भरधाव नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसने उडवल्याची घटना सोमवारी सकाळी 11.15 च्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही, अशी माहिती तपास अधिकारी स्मिता ढाकणे यांनी सांगितले.

सोमवारी सकाळी 11.15 च्या सुमारास नागपूर सीएसटी सेवाग्राम एक्स्प्रेस जात असल्याने दिवा रेल्वे स्थानकाजवळील फाटक बंद होते. त्यावेळी अ‍ॅक्टिव्हावरून आलेल्या दोन तरुणांनी बंद फाटकातून जाण्याचा प्रयत्न केला. बंद फटकाच्या खांबा खालून दुचाकी नेत असताना भरधाव एक्स्प्रेसने त्या दोघांना उडवले. या धडकेत दुचाकीचा पूर्ण चेंदामेंदा झाला तर दोघेही तरुण जागीच ठार झाले. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. दोघा तरुणांकडे कुठलेही ओळखपत्र अथवा इतर दस्तावेज आढळून न आल्याने दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

मात्र, अपघातात मृत झालेल्या एका तरुणाच्या हातावर रामचरण तर दुसर्‍या तरुणाचे नाव अंग्रेज असे असल्याचे ढाकणे यांनी दिली. दोन्ही तरुण बिगारी कामगार असून ते दिवा नाक्यावर काम करतात, अशी देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिवा नाक्यावर काम करणार्‍या इतर कामगारांकडे चौकशी करून दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.