Thu, Dec 12, 2019 23:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)

कामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)

Published On: Jul 22 2019 9:20AM | Last Updated: Jul 22 2019 9:20AM
पनवेल : प्रतिनिधी 

कामोठे वसाहतीमधील सेक्टर ६ मध्ये रात्री ८ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास एक विचित्र अपघात घडल्याचे समोर आले आहे. या अपघातात एका स्कोडा गाडीने रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या ७ ते ८ वाहनांना धडक देवून रस्त्यावरून चालणाऱ्या ७ जणांना या गाडीने उडवले. या अपघातात ७ वर्षीय बालकासह २ जणांचा मृत्यू झाला आहे. 

वैभव गुरव (वय, ३२) आणि सार्थक चोपडे  (वय, ६७) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची नावे आहेत. तर साधना चोपडे (वय, ३०), श्रद्धा जाधव (वय, ३१), शिफा (वय, १६), आशिष पाटील (वय, २२ ) आणि प्रशांत माने अशी जखमींची  नावे आहे. कामोठे सेक्टर ६ मधील त्रिमुर्ती कॉम्प्लेक्सच्या चौकात हा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर स्कोडा गाडीतील वाहन चालक फरार झाला आहे. या अपघातातील स्कोडा गाडी (नंबर एमएच ०१ बीएफ  ९९३) साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही गाडी सायन पनवेल महामार्गावरून कामोठे वसाहतीमध्ये आली. तर पुढे ती शिवसेना शाखेजवळून राईट मारत आत शिरली. याचवेळी सरोवर हॉटेलजवळ त्रिमुर्ती चौकात रस्त्यावर उभ्या असलेल्या लोंकाना धडक दिली. या गाडीने रस्त्याच्या शेजारी असलेल्या ८ वाहनांना धडक दिली. यामध्ये अॅक्टिव्ह बाईकवर असलेल्या एका ७ वर्षीय बालकाला जोरात धडक दिल्याने तो जागीच ठार झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. 

यानंतर रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या स्कूल बसमुळे ही स्कोडा गाडी जागेवर थांबली. अन्यथा या गाडीने रत्यावर चालणाऱ्याचा अनेक बळी घेतले असते.