मनोर (पालघर) : वार्ताहर
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर मनोर जवळील हालोली येथे कंटेनर दुचाकीला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला असून एक महिला गंभीर जखमी आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर येथे भरधाव कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यु झाला तर महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत व्यक्ती दामखिंड येथील एकाच कुटुंबातील असल्याचे समजते.