Wed, Jul 17, 2019 20:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मध्यवैतरणा जलाशयात " पुन्हा " सापडले स्री व पुरूषाचे प्रेत

मध्यवैतरणा जलाशयात " पुन्हा " सापडले स्री व पुरूषाचे प्रेत

Published On: Apr 09 2018 9:45AM | Last Updated: Apr 09 2018 9:45AMखोडाळा (जि. पालघर) : दीपक गायकवाड 

मोखाडा तालुक्यातील कोचाळा सरहद्दीत असलेल्या मध्यवैतरणा जलाशयात ५० ते५५ वयोगटातील एक स्री व एका पुरूषाचे प्रेत मध्यवैतरणा पुलाजवळ खोडाळा मार्गाकडे तरंगत्या अवस्थेत सापडले आहे. फेब्रूवारी महिन्यामध्येही अशाच प्रकारे एका पुरूषाचे प्रेत जलाशयात सापडले होते. फेब्रूवारी ते एप्रील दरम्यान अवघ्या तीन महिण्यांत तीन प्रेते मिळून आल्याने जलाशयाबरोबरच जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरनीवर आला आहे.

दिनांक ६ फेब्रूवारी रोजी  एका ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्‍तीचे प्रेत तरंगतांना मिळून आले होते. त्यानंतर अवघ्या दोनच महिण्यात ही दुसरी घटणा घडली असून, यामध्ये एका महिलेचे आणि एका पुरूषाचे प्रेत एकमेकांच्या मिठीत तरंगत्या स्थितीत मिळाले आहे. या दोन्हीही घटणेतील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटणेतील दोन्हीही प्रेते जिर्ण अवस्थेत सापडल्याने त्यांची ओळख पटवणे दुरापास्त आहे. मात्र, मयत स्रीच्या अंगावर काळ्या रंगाचा ब्लाऊज तर बदामी रंगाचे लाल काठाचे काष्टी पातळ असून, पुरूषाच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा शेर्ट आहे. या वर्णनाचे कोणी महिला व पुरूष बेपत्ता असल्यास मोखाडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक प्रकाश सोनवणे यांनी केले आहे.

मोखाडा तालुक्यातील मौजे काष्ठी येथील एक महिला व एक पुरूष बेपत्ता असून, तेथील बेपत्ता व्यक्तिंच्या नातेवाईकांना मृत व्यक्तिंची ओळख पटविण्यासाठी बोलावण्यात आले असल्याचे खोडाळा पोलिस दुरक्षेत्राकडून सांगण्यांत आले आहे.

Tags : palghar, district, mokhada talika, Reservoir