Sat, Apr 20, 2019 08:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘त्या’ कावळ्याची दोन दिवसांनी मांज्यातून सुटका!

‘त्या’ कावळ्याची दोन दिवसांनी मांज्यातून सुटका!

Published On: Aug 25 2018 11:16AM | Last Updated: Aug 25 2018 11:16AMअंबरनाथ: प्रतिनिधी

झाडावरील मांज्यामध्ये अडकलेल्या कावळ्याची तब्बल दोन दिवसांनी सुटका करण्यात अंबरनाथ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. अंबरनाथ पूर्व भागातील मोहन पुरम परिसरातील एका झाडावर कावळा मांज्यामध्ये अडकला होता. अनेक प्रयत्नानंतरही या कावळ्याची सुटका होऊ शकली नव्हती. 

कावळ्याची जोरदार कावकाव ऐकून एका रहिवाशाचे लक्ष गेल्यानंतर त्याने माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर त्यांनी मोठ्या शिताफीने या कावळ्याची सुटका केली.