Sat, Jul 20, 2019 23:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंब्र्यातील युवतीवर दिव्यात सामूहिक अत्याचार करणार्‍या दोघांना अटक

मुंब्र्यातील युवतीवर दिव्यात सामूहिक अत्याचार करणार्‍या दोघांना अटक

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 15 2018 12:54AMठाणे : प्रतिनिधी

मुंब्रा येथे राहणार्‍या एका 20 वर्षीय युवतीवर तिच्याच ओळखीच्या दोघांनी अत्याचार केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या दोघा आरोपींचा शोध सुरू केला होता. अखेर मुंब्रा पोलिसांनी विशाल व रोशन नामक दोघा व्यक्तींना अटक केली असून त्यांना 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंब्रा येथे राहणारी 20 वर्षीय पीडित तरुणी सोमवारी दिवा येथे कामावर गेली होती. दरम्यान, पीडित युवती सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास कामावरून सुटल्यावर रिक्षाची वाट पाहत उभी होती. तेव्हा पीडित युवतीच्या पाळतीवर असलेल्या तिच्या परिचयातील विशाल व रोशन या नराधमांनी तिला रिक्षात बसण्याचा आग्रह धरला. तसेच घरी सोडण्याचे आमिष दाखविले. दोघेही पीडित तरुणीच्या ओळखीचे असल्या कारणाने ती त्यांच्या रिक्षात बसली. मात्र पीडित युवती रिक्षात बसल्यावर दमदाटी करीत दोघांनी तिला दिवा येथील बी.आर.नगर येथील बंद खोलीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. 

पीडितेने कशीबशी आपली सुटका करून घेतली व घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर सदर घटनेची तक्रार मुंब्रा पोलिसांत करण्यात आली असून अखेर त्या दोघा तरुणांना पोलिसांनी शुक्रवारी मुंब्रातून अटक केली. अटकेतल्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Tags : Mumbai, two arrested, sexually assaulting, woman, Mumbra, Mumbai news,