Tue, Nov 20, 2018 11:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शैलेश नीमसे यांच्या हत्येचे आरोपी गजाआड 

शैलेश नीमसे यांच्या हत्येचे आरोपी गजाआड 

Published On: Apr 25 2018 1:10PM | Last Updated: Apr 25 2018 1:10PMठाणे : प्रतिनिधी

शहापुर शिवसेना तालुका प्रमुख शैलेश नीमसे यांच्या हत्येत सहभागी असलेल्‍या आरोपींना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. शैलेश नीमसे यांच्या पत्नीनेच सुपारी देवून शैलेश यांची हत्‍या केली होती. सीसीटीव्ही फुटेज  आणि इतर तांत्रिक बाबींतून हा खुलासा झाला आहे. 

२० एप्रिल रोजी शैलेश यांचा मृतदेह देवचौले गावात अर्ध जळालेल्‍या अवस्‍थेत आढळून आला होता. निमसे यांच्या हत्येनंतर ओळख पटू नये यासाठी मृतदेह पेटवून देण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्‍या तपासात शैलेश यांच्या पत्‍नीनेच त्‍यांना मारण्यासाठी नातेवाईकांना दीड लाख रूपयांची सुपारी दिली असल्‍याची माहिती समोर आली.

दरम्‍यान शैलेश यांच्या हत्‍येतील अजून तीन आरोपी फरार आहेत.

Tags : Shivsena,Thane District, Leader, Shailesh Nimse, Murder, case, Accused