Tue, Mar 26, 2019 22:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतल्या जुळ्यांची कमाल; मिळाले समान गुण!

मुंबईतल्या जुळ्यांची कमाल; मिळाले समान गुण!

Published On: May 20 2018 1:14PM | Last Updated: May 20 2018 1:14PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

परीक्षा संपली उत्सुकता लागते ती निकालाची. कुणाला किती मार्क मिळाले तर कोण राज्यात पहिला येईल अशा अनेक प्रश्नांचा गोंधळ मनात सुरू असतो. नुकताच 'द कॉन्सील फॉर द इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशन' (CISCE) बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल लागला आहे. या दोन्ही निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. तर मुंबईमध्ये राहणाऱ्या राहुल आणि रोहन चेम्बाकसेरिल या जुळ्या भावांनी बारावीच्या परीक्षेत एकसारखे मार्क मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

राहुल आणि रोहन चेम्बाकसेरिल हे पश्चिम मुंबईतील खार येथील 'जसूदबेन एम.एल. विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. राहुल आणि रोहन हे दोघे फक्त जुळेच दिसत नसून त्यांनी बारावीच्या परीक्षेत एकसारखे मार्क मिळवले आहेत. दोघांनाही ९६.५ टक्के मिळवले आहेत. जुळे लोक एकसारखे दिसत असतातच, त्यांच्या अनेक सवयी आणि छंद ही एकसारखे असल्याचे आढळते. मात्र या जुळ्यांनी परीक्षेत एकसारखे मार्क मिळवून सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या या एकसारख्या मार्काचे वृत्त रोहन आणि राहुल यांची आई सोनल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.

जसूदबेन एम.एल. विद्यालयाचा दहावीचा आणि बारावीचा निकाल 99 टक्के लागला आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या सात विद्यार्थ्यांनी 99.5 टक्के, सतरा विद्यार्थ्यांनी 99.25 टक्के तर 25 विद्यार्थ्यांनी 99 टक्के गुण मिळवले आहेत.