Fri, Mar 22, 2019 07:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : वरध घाटात चौदा चाकी गाडीला अपघात

रायगड : वरध घाटात चौदा चाकी गाडीला अपघात

Published On: Jul 31 2018 7:57PM | Last Updated: Jul 31 2018 7:57PMरायगड : प्रतिनिधी

शनिवारी महाबळेश्वर मार्गावरील अंबेनळी घाटात झालेला अपघात ताजा असतानाच आज वरध घाटामध्येही चौदा चाकी गाडी एका वळणावर अडकल्याने या मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती. पावसाळ्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने या मार्गावरील शिवशाही गाडीची लांबी लक्षात घेऊन या मार्गावरीलही सेवा रद्द केली आहे. असे असताना देखील पुणे मार्गावरून मोठ्या वाहनांचा प्रवास अजूनही चालू असलयाचे आज पुन्हा उघड झाले आहे. या विरोधात पोलिस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. 

दरम्‍यान, महाबळेश्वर मार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणी तात्पुरते बांबूचे संरक्षक रोलिंग लावण्यात आले आहेत. या ठिकाणी खड्डे मारण्यात आले होते त्याची माती रस्त्यावर आल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाता नंतर या ठिकाणी तातडीने बांबूचे कळक बसविण्यात आले आहेत. अपघाता नंतर या अपघाताची चौकशी करण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने त्रिसद्यस्य समितीची नेमणूक केली आहे. या समितीत कृषी विद्यालयाचे डीन व विद्यापिठातील दोन उच्च अधिकारी असणार आहेत. अपघात कसा झाला याची पूर्ण चौकशी करून, गाडीची पूर्ण माहीती घेण्यात येणार असल्‍याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.