Tue, Mar 19, 2019 05:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीच्या 3 परिचारिकांचा पुलाखाली मृत्यू

डोंबिवलीच्या 3 परिचारिकांचा पुलाखाली मृत्यू

Published On: Mar 15 2019 10:28AM | Last Updated: Mar 15 2019 10:28AM
मुंबई : प्रतिनिधी

सीएसएमटी स्टेशनजवळील पूल दुर्घटनेत बळी गेलेल्या पाच जणांमध्ये तीन डोंबिवलीकर परिचारिकांचा समावेश आहे. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या दोन्ही परिचारिका गोकूळदास तेजपाल रूग्णालयात कार्यरत होत्या. तर भक्ती शिंदे या सेंट जॉर्ज रूग्णालयात कार्यरत होत्या. जीटी  रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी ही माहिती दिली.

जीटी रुग्णालयातील कर्मचारी वनिता जामखंडे यांनी सांगितलं, अपूर्वा प्रभू या ओटी विभागात तर रंजना तांबे ऑर्थो विभागात कार्यरत होत्या. दोघी रात्रपाळीसाठी कामाला येत असतानाच सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पुलाचा मधला भाग कोसळला आणि त्यात त्यांचा बळी गेला.

अपूर्वा प्रभू रंजना तांबे भक्‍ती शिंदे अपुर्वा प्रभु डोंबिवली पश्‍चिमेला अग्निदिव्यंदिरासमोर उदयराज बिल्डिंगमध्ये राहात, तर रंजना तांबे या डोंबिवली पश्‍चिमेलाच गणेशनगरात सिद्धि शिवसागर कॉम्प्लेक्समध्ये राहात. मुंबईतील या दुर्घटनेने जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयासह डोंबिवलीवरही शोककळा पसरली आहे.

घाटकोपरचा बेल्टवाला जाहीद गेला
घाटकोपर : सीएसएमटी स्थानक पूल दुर्घटनेत घाटकोपरच्या नित्यानंदनगर विभागात राहणार्‍या जाहीद सिराज खान (32) याचा मृत्यू झाला. त्याचा घाटकोपर स्थानकाजवळ बेल्टचा धंदा होता. जाहीद वडील सिराज खान यांच्यासह क्रॉफर्ड मार्केटमध्ये सामान आणण्यास गेला होता. त्याचवेळी त्याला मृत्यूने गाठले. वडील गंभीर जखमी झाले आहेत. जाहीद याला दोन लहान मुले असून त्याच्या मृत्यूने विभागावर शोककळा पसरली आहे.