Fri, Nov 16, 2018 20:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये तृतीयपंथीयांकडून दुकानदाराला मारहाण

कल्याणमध्ये तृतीयपंथीयांकडून दुकानदाराला मारहाण

Published On: Mar 06 2018 9:34PM | Last Updated: Mar 06 2018 9:34PMकल्याण : वार्ताहर

कल्याणमध्ये तृतीयपंथीयांकडून दुकानदाराला मारहाण करण्यात आल्‍याची घटना समोर आली आहे. कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यलयासमोरील उसाचा रस विक्री करणाऱ्या दुकानदाराने पैसे देन्यास नकार देत थोड्या वेळाने या असे सांगितल्याने संतापलेल्या तृतीय  पंथीयांनी दुकानदाराला मारहाण केली. तसेच दुकानातील सामानाची नासधूसही केली.  

दुकानदाराने या मारहाणी प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर रसवंती गृह आहे. या दुकानात मंगळवारी सायंकाळी ग्राहकांची उसाचा रस पिण्यासाठी गर्दी होती. त्याचवेळी काही तृतीय पंथीय दुकानासमोर आले. त्यांनी दुकानदाराकडे पैशाची मागणी केली. धंद्याची वेळ आहे थोडय़ा वेळाने या असे दुकानदाराने त्‍यांना सांगितले. असे सांगताच तृतीय पंथीयांनी त्याच्या दुकानासमोर गोंधळ करण्यास सुरुवात केली. तसेच दुकानात घुसून गोंधळ घातला. दुकानदार मंदार कटके यांना मारहाण करत  दुकानातील साहित्याची तोडफोड केली. हा प्रकार पाहून भयभीत झालेले ग्राहक तेथून पळून गेले.

या वेळी बघ्यांनी एकच गर्दी केली मात्र, कुणीही कटके यांच्या मदतीसाठी आले नाही. या सगळ्य़ा घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.