Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत शिकाऊ डॉक्टरची आत्महत्या 

मुंबईत शिकाऊ डॉक्टरची आत्महत्या 

Published On: Feb 17 2018 4:08PM | Last Updated: Feb 17 2018 4:08PMपनवेल : विक्रम बाबर 

कामोठे एम.जी.एम हॉस्पिटल मधील शिकाऊ डॉक्टरने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. 

नवी मुंबई परिसरातील कामोठे एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस च्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या एका डॉक्टरने कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. 

त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलीसांच्याकडून सांगण्यात आले. विमलकुमार वेळू मडस्वामी पिल्लय असे शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे.