Sat, Jul 20, 2019 10:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहतूक पोलिसाची वृद्ध व्यापार्‍याला मारहाण

वाहतूक पोलिसाची वृद्ध व्यापार्‍याला मारहाण

Published On: Feb 12 2018 2:13AM | Last Updated: Feb 12 2018 1:43AMउल्हासनगर : वार्ताहर

टोइंग गाडीने अ‍ॅक्टिवा उचलल्यावर वृद्ध व्यापार्‍याने वाहन सोडण्यावरून शाब्दिक वाद घातल्याने वाहतूक शाखेच्या हवालदाराने या व्यापार्‍याला मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी उल्हासनगरात घडली. या प्रकारातून उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने या व्यापार्‍याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व्यापार्‍यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

17 सेक्शन परिसरात व्यापारी लुल्ला यांनी त्यांची अ‍ॅक्टिवा रोडवर उभी केली होती. त्यावेळी आलेल्या टोइंग गाडीने ती उचलून गाडीत ठेवली. व्यापार्‍याने दुचाकी खेचण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरील वॉर्डनने दुचाकी घट्ट पकडून ठेवल्याने व्यापार्‍याला ती खेचता आली नाही. त्यांनी गाडीत बसलेले हवालदार बळीराम पाटील यांच्याकडे गाडी सोडण्याचा तगादा लावला. तसेच पाटील यांचा पायही खेचला, मात्र अपशब्द वापरल्याने संतप्त पाटील हे खाली उतरले आणि त्यांनी व्यापार्‍याच्या कानाखाली वाजवली. 

यामुळे संतापलेल्या लुल्ला यांनीही पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर हवालदार पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या दोन वॉर्डननी लुल्ला यांना बेदम मारहाण केली. उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने लुल्ला यांना शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळातच मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.