Sat, Nov 17, 2018 00:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेशन दुकानात तूरडाळ ३५ रुपये किलो दरानेच

रेशन दुकानात तूरडाळ ३५ रुपये किलो दरानेच

Published On: Aug 24 2018 3:02PM | Last Updated: Aug 24 2018 3:02PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई-ठाणे शिधावटप क्षेत्रांतील अधिकृत शिधावाटप दुकानात तूरडाळ ३५ रुपये किलो दरानेच विकण्याची सूचना देण्यात आली आहे. माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी तूरडाळीच्या दराबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे  सांगितले.

रेशन दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या तूरडाळींच्या पाकीटांवर ५५ रुपये प्रतिकिलो असा दर छापलेला आहे. माथ,या तूरडाळीच्या पाकीटांवर ३५ रुपये प्रतिकिलो असे स्टिकर लावून त्याच दराने रास्त भाव दुकानदारांकडून सर्व शिधापत्रिकाधारकांना विक्री करण्यात येत असल्याचेही माहिती नागरी पुरवठा विभागाच्या संचालकांनी दिली.