Wed, Mar 27, 2019 00:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुर्बानीसाठी नील आर्मस्ट्राँगला परवाना दिला पण...

कुर्बानीसाठी नील आर्मस्ट्राँगला परवाना दिला पण...

Published On: Aug 22 2018 1:37AM | Last Updated: Aug 22 2018 7:43AMमुंबई : प्रतिनिधी 

कुर्बानीचा ऑनलाईन परवानाच काय नील आर्मस्ट्राँगला ऑनलाईन तिकीटही मिळू शकते.ऑनलाईन बुकिंग हे कोणत्याही व्यक्तीला मिळू शकते. मात्र त्याची वैधता तपासल्यानंतर त्याला मान्यता दिली जाते. त्याच पद्धतीने कुर्बानीचा ऑनलाईन परवाना दिला तरी देवनारमधून कुर्बानीसाठी बकरा बाहेर नेताना त्या परवान्याशी मिळतीजुळती वैध कागदपत्रे आणि ओळखपत्र सादर करणे बंधनकारक आहे, असा दावा पालिका प्रशासनाने करून ऑनलाईन परवान्याचे समर्थन केले. पालिकेचा दावा न्यायालयाने मान्य करून ऑनलाईन परवान्याला हिरवा कंदील दिला. तसेच नियमांचे पालन करून आठ दिवसांनी प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पालिका प्रशासनाला दिले.

22 ऑगस्टच्या रोजी बकरी ईदच्या पार्श्‍वभमीवर मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात बकर्‍यांची आणि मेंढ्यांची कत्तल करतात. देवनार पशुवध केंद्रावर या दिवशी मोठा ताण पडतो. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने 22 ते 24 ऑगस्टदरम्यान तात्पुरती परवानगी दिली. पालिकेन दिलेली परवानगी ही बेकायदा आहे, असा दावा करून या परवानगीला अनुसरून काढण्यात आलेल्या दोन नोटिसांना आव्हान देणारी जनहित याचिका जीव मैत्री ट्रस्टने  उच्च न्यायालयात दाखल  केली. एवढेच नव्हेतर नील आर्मस्ट्राँगला बकरी ईदच्या कुर्बानीसाठी परवाना दिल्याचा पुरावा सादर करून ऑनलाईन परवान्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. 

सुनावणीच्यावेळी पालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅड.अनिल साखरे यांनी नील आर्मस्ट्राँगच्या नावे  मुंबई-पुणे ऑनलाईन रेल्वे तिकीटच न्यायालयात सादर  केले. ऑनलाईन तिकिटाप्रमाणेच  कुर्बानीचा ऑनलाईन परवान्यालाही देवनारमधून कुर्बानीसाठी बकरा बाहेर नेताना त्या परवान्याशी मिळतीजुळती वैध कागदपत्र ेआणि ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच बकरी ईदच्या दोन दिवसामध्ये मुंबईत सुमारे 5 लाख लोक  बकरी ईदच्या सणाला सुमारे 2 ते 3 लाख बकर्‍यांची कुर्बानी 

महानगरपालिकेच्या हद्दीत अपेक्षित आहे. या दोन्ही दिवशी दिवसभर कुर्बानीचे अवशेष उचलण्यासाठी पालिकेतर्फे वॉर्डनुसार कचरा उचलणार्‍या गाड्या दिवसभर फिरतीवर असणार आहेत. जेणेकरून प्राण्यांच्या अवशेषांमुळे इतर समस्या निर्माण होणार नाहीत, अशी हमी दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने ऑनलाईन परवान्याला परवानगी दिली.