Wed, May 22, 2019 07:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंबरनाथ बलात्कार; संशयिताचा शोध सुरू

अंबरनाथ बलात्कार; संशयिताचा शोध सुरू

Published On: Mar 06 2018 5:58PM | Last Updated: Mar 06 2018 6:42PMटिटवाळा : प्रतिनिधी 

कल्याण तालुक्यातील आणे भिसोळ जवळ असलेल्‍या चिंचपाडा-नालंबी या गावालतगच्या रस्त्यावरील टेकडीवर दिनांक ५ रोजी एका लुटारूने युवतीवर बलात्‍कार केल्‍याची घटना घडली. यावेळी प्रतिकार करणार्‍या युवतीच्या प्रियकराची लुटारूने गोळी झाडून हत्‍या केली होती. या घटनेनंतर पळून गेलेल्‍या लुटारूची शोध मोहिम सुरू असून, यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी, चिंचपाडा-नालंबी गावालगतच्या टेकडीवर रात्री ८ च्या सुमारास  एक तरूण आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर बोलत बसलेला होता. यावेळी त्या ठिकाणी लुट करण्याच्या उद्देशाने आलेल्या  एका तरूणाने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची आणि दुचाकीची चावी मागितली. यावेळी त्‍या लुटारूने तरूणीवर जबरदस्‍ती करण्याचा प्रयत्‍न केला. याप्रसंगी मुलीचा प्रियकर त्याला विरोध करण्यासाठी पुढे आला असता, त्या लुटारूने त्याच्यावर गोळी झाडली यावेळी त्‍या प्रियकराचा जागीच मृत्‍यू झाला. यानंतर त्या लुटारूने तरूणीलाही बंदुकीचा धाक दाखवत तीच्यावर जबरदस्तीने  बलात्कार करून तेथून पळ काढला.असे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या आपल्‍या जबानीत सांगितले आहे. हत्‍या झालेला तरूण हा शहापूर तालुक्यातील अस्नोली गावात राहणारा असून, तो सध्या कामानिमित्त नातेवाईकांसोबत अंबरनाथला राहात होता. 

सदर परिसर हा जास्त रहदारीचा नसल्याने त्या तरूणीच्या मदतीस कोणी येऊ शकले नाही. हा सगळा प्रकार झाल्यानंतर  येणार्‍या-जाणाऱ्यांकडे मदत मागितली असता, गावातील काही नागरिकांनी पोलिसांना या घटनेबाबत कळवले.  या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे व ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे हे आपल्या पथकासह घटना स्थळी पोहचले. या घटनेत मृत झालेल्या तरूणाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी मुंबई येथील जे.जे.रूग्णालयात पाठवला आहे. तर पीडित तरूणीवर उल्हासनगरच्या सेन्ट्रल रुग्णालयात उपचार चालू असून, तीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या घटनेचा पुढील तपास टिटवाळा पोलिस करीत आहेत. आरोपीच्या शोधासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची ४ पथके रवाना झाली आहेत.

तालुक्यातील आणे भिसोळा मार्गे अंबरनाथ जाणार्‍या रस्त्यावरील चिंचपाडा ते नालंबी या गावालगतचा रस्त्‍यावर रात्रीच्या वेळी वाहतूक नसते. हा रस्ता पुढे आंबरनाथला निघतो. कल्याण व अंबरनाथ तालुक्यांना जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. मात्र जास्त राह्दारी नसलेल्या या परिसरांत पथदिवे देखील पुरेसे नाहीत त्‍यामुहे या मार्गावर या आधीही लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. तर टिटवाळा आणि अंबरनाथ या दोन पोलिस स्टेनच्या हद्दीवर असलेल्या या परिसरांत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठोस उपायोजना करण्यात यावी अशी मागनी या घटनेमुळे आता या परिसरांतील नागरिकांतून होत आहे.