Sun, May 26, 2019 20:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेचा सर्वर डाऊन, तिकीट ठप्प 

रेल्वेचा सर्वर डाऊन, तिकीट ठप्प 

Published On: Apr 30 2018 6:50PM | Last Updated: Apr 30 2018 6:50PMठाणे : अमोल कदम

रेल्वेच्या तांत्रिक कारणामुळे सोमवार सकाळ पासून रेल्वेच्या हद्दीतील सर्व कार्यालयात सर्वर डाऊन झाला होता. त्यामुळे प्रवाशांना तिकीट वेळेवर मिळत नव्हते. दुपारी तीन नंतर हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येण्यास सुरुवात झाली. परंतु स्थानक दरम्यान तिकीटाकरिता प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने प्रवाशांचे सर्वर डाऊन मुळे हाल झाले. 

मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, पश्चिम रेल्वे, ट्रान्सहार्बर रेल्वे या ठिकाणी रेल्वेचे कार्यालयात रेल्वेचा इंटरनेट सर्वर बंद झाला होता. त्यामुळे सकाळपासून सर्व स्थानक परिसरात प्रवाशांची तिकिटाकरिता प्रचंड गर्दी झाली होती. तिकीट मिळत नसल्याने रांगेत उभा राहल्यामुळे काही प्रवाशांनी बिना तिकीट रेल्वेतून प्रवास केला. परंतु आरक्षण तिकिट काढण्याकरिता आलेल्या प्रवाशांना तिकिटाकरिता ताटकळत राहावे लागले. दुपारी तीननंतर रेल्वे प्रशासनाच्यावतीने सर्वर बंद असल्याचे काम युद्ध पातळीवर करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर तीन नंतर सर्वर हळूहळू पूर्व पदावर येणे सुरु झाले असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पण प्रवाशांना तब्बल दहा मिनिटे तिकिटाकरिता तिकीट घरासमोर उभे राहून तिकिटाकरिता वाट पाहावी लागत होती. त्यामुळे प्रवाशांचे तिकिटाकरिता प्रचंड हाल झाले.  

आरक्षण वेबसाईड देखील झाली बंद

लांबपल्याच्या गाड्यांनि सुट्टी मध्ये बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण तिकीट घरासमोर तासंतास उभे असलेल्या प्रवाशाना तिकीट काढताना खूप त्रास सहन करावा लागला. आरक्षण वेब साईड संपूर्णपणे बंद झाल्याने प्रवाशांना सोमवारी तिकीट काही बुक करता आले नाही.