Tue, Mar 19, 2019 16:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणेः भातसा नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू

ठाणेः भातसा नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू

Published On: May 21 2018 4:21PM | Last Updated: May 21 2018 4:24PMटिटवाळा :  प्रतिनिधी

खडवली येथील भातसा नदी किनारी ओझरली गावात सहलीसाठी आलेल्या तिघा तरुणांचा भातसा नदीत बूडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

बुडालेले तिघेही ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात राहणारे असून त्यांची नावे रोशन कामत (वय ३० वर्ष), सुरज उदय सिंह (वय ३०वर्ष), राजेश शेरसिंग रयटा (वय ३५ वर्ष) अशी आहेत.

या घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस व कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा शोध घेतला. मात्र अथक प्रयत्न करूनही मृतदेह हाती लागले नाहीत. तसेच अंधार पडल्याने शोध कार्यात अडथळा येत असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. आज (सोमवार) सकाळी शोध घेतला. त्यावेळी तिघांचेही मृतदेह आढळून आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आले असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Tags : three youth death, drawn, bhatasa river, titwala, mumbai news