Tue, Jul 16, 2019 02:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, ढिगार्‍याखाली माणसं अडकल्याची भिती 

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, ढिगार्‍याखाली माणसं अडकल्याची भिती 

Published On: Jul 24 2018 10:49PM | Last Updated: Jul 24 2018 10:49PMभिवंडी : संजय भोईर

भिवंडी शहरालगत खोणी ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपार रसूलबाद परिसरात आठ वर्ष जुनी तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. या दुर्घटनेत ढिगार्‍याखाली आठ ते दहा नागरिक अडकल्याची भिती व्यक्त केली जात असून अजुन तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. 

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व स्थानीक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले असून एक दहा वर्षीय मुलगी व वयस्कर महिला यांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
घटनास्थळ हे गल्लीबोळात अडचणीच्या जागेत असल्याने घटनास्थळी बचाव कार्य करण्यात अडचणी येत आहेत.