Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई  उडा देंगे

मुंबई  उडा देंगे

Published On: May 24 2018 1:51AM | Last Updated: May 24 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी

कायम अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेली मुंबापुरी बुधवारी दुपारी मुंबई सेंट्रल रेल्वे कंट्रोल रूममध्ये आलेल्या एका धमकीच्या कॉलने हादरली. मुंबई उडा देंगे असे सांगणारा हा कॉल होता. या कॉलने तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून शहरात हायअर्लट जारी करण्यात आला आहे.

रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील 182 नंबरच्या हेल्पलाईनवर बुधवारी एकच्या सुमारास मोबाईलवरुन फोन आला. फोन करणार्‍या व्यक्तीने पश्‍चिम बंगालच्या वर्धमान पोलीस नियंत्रणकक्षातून उपनिरीक्षक देबाशीष दास बोलत असल्याचे सांगत, एका व्यक्तीनेफोनवरून मुंबई उडा देेंगे असा कॉल केला असल्याचे सांगितले. रेल्वे पोलिसांनी आणि आरपीएफने तात्काळ मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकासह अन्य महत्त्वाच्या स्थानकांवरील सुरक्षा वाढवत बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्‍वान पथकाच्या मदतीने संशयास्पद वस्तू, व्यक्तींची तपासणी सुरू केली. धमकीच्या या कॉलनंतर संपूर्ण शहरात हाय अर्लट जारी करण्यात आला. कॉल करणार्‍या व्यक्तीने पश्‍चिम बंगालमधील वर्धमान पोलीस नियंत्रण कक्षाचे नाव सांगितले असल्याने पश्‍चिम बंगाल पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे. कॉल करण्यासाठी वापरलेल्या मोबाईल, तसेच अन्य तांत्रिक यंत्रणांच्या आधारे कॉल करणार्‍या व्यक्तीचा व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याचे रेल्वेचे पोलीस उपायुक्त समाधान पवार यांनी सांगितले.