मुंबई : प्रतिनिधी
फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये होणार्या दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी प्रायोगिक तत्त्वावर फक्त पुणे विभागीय शिक्षण मंडळातून परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट देण्यात येणार आहे. पुणेसह, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातून हॉलतिकिटाची प्रिंट मुख्याध्यापकांच्या सही, शिक्क्याने देण्यात येणार आहे.
ऑनलाईन हॉलितिकिटासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, अशा सूचनाही राज्य शिक्षण मंडळ सचिव के. बी. पाटील यांनी दिल्या आहेत. हॉलतिकिटांमध्ये काही चुका असल्यास त्या विभागीय शिक्षण मंडळाकडून दुरुस्ती करून घ्यावयाच्या आहेत. तसेच विद्यार्थ्याचा फोटो चुकीचा असल्यास त्या जागी नवा फोटो चिकटून घ्यायचा आहे.