Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उत्तर प्रदेशात साजरा होणार महाराष्ट्र दिन 

उत्तर प्रदेशात साजरा होणार महाराष्ट्र दिन 

Published On: Apr 28 2018 4:28PM | Last Updated: Apr 28 2018 4:28PMमुबंई : प्रतिनिधी

या वर्षीचा महाराष्ट्र दिन महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेशमध्ये देखील साजरा होणार आहे. या बाबतची घोषणा  उत्तर प्रदेशचे राज्यापाल राम नाईक यांनी मुंबईत केली. 

राम नाईक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नाईक म्हणाले ‘महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच एक अतूट नाते आहे. या दोन प्रदेशात सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार लखनौमध्ये १ आणि २ मे रोजी महाराष्ट्र दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.’ 

या कार्यक्रमामुळे दोन्ही राज्यांच्या सांस्कृतीची ओळख होण्यास मदत होणार आहे.